अमरावती : फिरत्या वाचनालय प्रदर्शनीचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन
अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.) :भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर पुस्तक महोत्सवाचे दि. 22 ते 30 नोव्हेंबर, 2025 या दरम्यान रेशीम बाग, नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी फिरत्या वाचनालय
विद्यापीठात फिरत्या वाचनालय प्रदर्शनीचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम


अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.) :भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर पुस्तक महोत्सवाचे दि. 22 ते 30 नोव्हेंबर, 2025 या दरम्यान रेशीम बाग, नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी फिरत्या वाचनालय प्रदर्शनी बसचे बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी विद्यापीठात आगमन झाले. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी फिरते वाचनालय प्रदर्शनीचे निरीक्षण करतांना प्रदर्शनीमध्ये असलेल्या विविध पुस्तकांबाबत जाणून घेतले. सदर बस ही 8 व 9 ऑक्टोबर असे दोन दिवस अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देणार आहे. तरी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी या फिरते वाचनालय प्रदर्शनी बसला भेट द्यावी आणि पुस्तकांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande