रायगड : पोलिसांनी लावला चोरीच्या माबाईल्सचा छडा
रायगड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।म्हसळा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम तपास यंत्रणेमुळे नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा वाढवणारी घटना घडली आहे. सुमारे १,२०,००० रुपयांच्या किंमतीचे चोरीला गेलेले ६ मोबाईल फोन शोधून मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात म्हसळा पोलिस
सतर्क पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले मोबाईल मालकांच्या हाती परत


रायगड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।म्हसळा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम तपास यंत्रणेमुळे नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा वाढवणारी घटना घडली आहे. सुमारे १,२०,००० रुपयांच्या किंमतीचे चोरीला गेलेले ६ मोबाईल फोन शोधून मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात म्हसळा पोलिसांना यश आले आहे.

तिन ते चार महिन्यांपूर्वी म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांचे मोबाईल फोन हरविल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून हरविलेले मोबाईल शोधण्याची मोहीम राबवली.

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक कहाळे यांच्या टीमने सतर्कतेने कारवाई करून सहाही मोबाईल शोधून काढले. या मोबाईलची एकूण किंमत १ लाख २० हजार रुपये इतकी आहे.यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांच्या मोबाईल परत देण्यात आले. या लाभार्थ्यांमध्ये संतोष पानसरे, योगेश भागवत, सुदेश देवडे, जमीर तुरुक, अजिज नजीर आणि स्वप्नील लाड या सहा नागरिकांचा समावेश आहे.म्हसळा पोलिसांनी दाखविलेली तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि संदीप कहाळे यांचे नेतृत्व यामुळे हे यश मिळाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल तक्रारदारांनी म्हसळा पोलिसांचे आणि संदीप कहाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande