परभणी, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ नगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. सोनपेठ नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात आरक्षण निश्चिततेकरीता उपजिल्हाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यातून प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. ते पुढील प्रमाणे..
प्रभाग क्रमांक 1 - एससी महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2- एससी व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 - सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 - नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 - सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10- नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis