परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी नगरपालिकेंतर्गत प्रभाग निहाय आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले.
येथील महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. सोडतीनुसार प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. ते पुढील प्रमाणे.
प्रभाग क्रमांक 1- एससी महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2- एससी व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3- एससी महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6- नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8- नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 9- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, तसेच प्रभाग क्रमांक 11- नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण महिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis