परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड नगरपालिकेंतर्गत प्रभाग निहाय आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिलांसाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील जागा निश्चित करण्यात आल्या. नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे - प्रभाग क्रमांक 01 (अ) ना.मा.प्र., (ब) सर्व साधारण (महीला), प्रभाग 02 (अ) अ. जाति (महीला), (ब) सर्व साधारण, प्रभाग 03 (अ) ना.मा.प्र (महीला), (ब) सर्व साधारण, प्रभाग 04 (अ) ना.मा.प्र (महीला), (ब) सर्व साधारण , 05 (अ) सर्व साधारण (महीला), (ब) सर्व साधारण , 06 (अ) ना.मा.प्र (महीला), (ब) सर्व साधारण , 07 (अ) अ. जाति (महीला), (ब) सर्व साधारण , 08 (अ) ना.मा.प्र, (ब) सर्व साधारण, 09 (अ) सर्व साधारण (महीला), (ब) सर्व साधारण , 10 (अ) अ. जाती, (ब) सर्व साधारण (महीला), 11 (अ) अ. जाति , (ब) सर्व साधारण (महीला) , 12 (अ) ना.मा.प्र, (ब) सर्व साधारण (महीला), 13 (अ) ना.मा.प्र (महीला), (ब) सर्व साधारण.
या सोडतीनंतर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, सर्वच पक्षांनी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis