छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.) सन 2024-25 या वर्षाच्या खरीप हंगामात खरीप गावांची तसेच ज्या रब्बी गावांत दोन तृतीयांश पेक्षा जास्त खरीपात पेरणी केलेली आढळली आहे, त्या गावांची पैसेवारी देखील खरीप हंगामात जाहीर करण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील खरीप पिकांच्या पैसेवारीमध्ये खरीप गावे एकूण 667 व रब्बी गावे 298 अशा एकूण 965 गावांची खरीप हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 971 गावांपैकी 667 खरीप गावे व 298 रब्बी गावे असे एकुण 965गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. तर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच मंठा तालुक्यातील चांदेश्वर व गोपेगाव हे गाव पुर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे तसेच गारटेकी, सोनुनकरवाडी व किर्तापूर तांडा या गावांना महसूल दर्जा प्राप्त नसल्यामुळे मंठा तालुक्यातील 5 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जालना जिल्ह्यातील पैसेवारी जाहीर केलेल्या एकुण 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. खरीप पिकांची हंगामी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुका - 151 गावे, बदनापूर-92, भोकरदन-156, जाफ्राबाद-101, परतूर-98, मंठा-117, अंबड-138, घनसावंगी-118 गावांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis