नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर (हिं.स.). काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत आरोपी वकिलाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी या घटनेचे वर्णन न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर थेट हल्ला असल्याचे सांगितले आणि अशा मानसिकतेला समाजात स्थान नसावे असे म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत खरगे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या सर्वोच्च संवैधानिक संस्थेत बसून जो कोणी सरन्यायाधीश किंवा इतर कोणत्याही न्यायाधीशांचा अपमान करतो आणि बूट फेकण्यासारखे कृत्य करतो तो केवळ एखाद्या व्यक्तीचाच नव्हे तर संविधानाचा आणि न्यायव्यवस्थेचाही अपमान करतो. अशा वकिलांचा बार असोसिएशनने केवळ निषेध केला पाहिजे असे नाही तर त्यांना आवश्यक कायदेशीर शिक्षेलाही सामोरे जावे. जर कोणी स्वतःला वकील म्हणवत असेल, पण त्याची विचारसरणी संविधान आणि समानतेच्या विरोधात असेल, तर त्याला प्रश्न विचारणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे