दुबार आणि संशयास्पद शिधापत्रिका रडारवर!
पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरणव्यवस्थेतील माहितीच्या आधारे संशयास्पद शिधापत्रिकांची माहिती राज्य सरकारला पाठवली आहे. त्यानुसार राज्यातील शिधापत्रिकांची तपासणी सुरू झाली आहे. संशयास्पद लाभार्थ्यांवर गंडांतर
दुबार आणि संशयास्पद शिधापत्रिका रडारवर!


पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरणव्यवस्थेतील माहितीच्या आधारे संशयास्पद शिधापत्रिकांची माहिती राज्य सरकारला पाठवली आहे. त्यानुसार राज्यातील शिधापत्रिकांची तपासणी सुरू झाली आहे. संशयास्पद लाभार्थ्यांवर गंडांतर येऊ शकते. जिल्हानिहाय या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

शिधापत्रिकांचे शुद्धीकरणाचे काम सुरू असून मृत, दुबार आणि संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 88 लाख 58 हजार लाभार्थ्यांवर ‌’मिशन सुधार‌’अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या पुरवठा निरीक्षकांकडून घरोघरी तपासणी सुरू असून, नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.राज्यातील काही जिल्ह्यांत बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा त्रुटी असलेल्या आधार क्रमांकांची प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. तसेच दुबार आधार क्रमांक असलेले, मूळचे भारतीय; पण परदेशी नागरिकत्व मिळालेले आणि ज्यांचे आधार क्रमांक निलंबित झाले आहेत, तसेच चुकीचे आधार क्रमांक असलेले नागरिक केंद्र सरकारने शोधून राज्यांना कळविले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande