सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती–भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी सुरू करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक गणेश सोनटक्के यांनी केले आहे.
गुणवत्तेनुसार निवड झालेल्या परंतु वसतिगृह क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विचारात घेतले जातील,असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड