‘कोल्ड्रिफ सिरप’ वापराबाबत तातडीची सूचना; विषारी घटक आढळल्याने बंदी - अश्विनी जमादार
नंदुरबार, 8 ऑक्टोबर (हिं.स.) मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कफ सिरपच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एका विशिष्ट बॅचच्या ‘कोल्
‘कोल्ड्रिफ सिरप’ वापराबाबत तातडीची सूचना; विषारी घटक आढळल्याने बंदी - अश्विनी जमादार


नंदुरबार, 8 ऑक्टोबर (हिं.स.) मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कफ सिरपच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एका विशिष्ट बॅचच्या ‘कोल्ड्रिफ सिरप’चा वापर तत्काळ थांबवण्याबाबत आणि त्याचा साठा विक्रीस न ठेवता वेगळा करण्याबाबत जनतेला आणि विक्रेत्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त अश्विनी जमादार यांनी कळविली आहे.

कोल्ड्रिफ सिरप, समूह क्रःएि आर 13 निर्मिती दिनांक मे 2025, कालबाह्यता दिनांक एप्रिल 2027, हे औषध मे. खेसन फर्मा, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांच्याद्वारे उत्पादन केलेले असुन त्यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol - DEG) हा विषारी घटक मिळालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता यांनी तत्काळ या औषधाचा वापर थांबवावा. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार कार्यालयास त्वरित कळवावे. सर्व औषध विक्रेते (Medical Stores), औषध वितरक (Distributors) तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सदर Coldrif Syrup, Batch No. SR-१३ चा साठा विक्रीस न ठेवता त्वरित वेगळा करून ठेवावा व संबंधित स्थानिक कार्यालयास माहिती द्यावी. सदर औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथील अधिकारी तामिळनाडू, औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा अश्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही सहायक आयुक्‍त जमादार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande