सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील 100 पाणंद रस्त्यांसाठी रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक गावचे पाणंद रस्ते खराब झाल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील माल पोहोचवण्यासाठी तसेच शेतीच्या कामासाठी त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. या संदर्भात आमदार राजू खरे यांनी मतदारसंघातील मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत 100 खडीकरण कामांना मंजुरी देऊन निधी देण्याची मागणी मंत्री रोहयो, फलोत्पादन व खारभूमी विकासचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे केली होती त्यानुसार त्यांनी 100 पाणंद रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी दिल्याची माहिती आमदार खरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड