सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। पंढरपुरात काही हुल्लडबाज तरुणांनी श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील भाविकांना दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या निमित्ताने मंदिरातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल होत आहे. पुणे येथील काही भाविक पहाटे दर्शनासाठी मंदिर परिसरात आले होते.
या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात तरुणांमध्ये आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये या तरुणांनी भाविकांवर दगड मारून हल्ला केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड