ठाणे, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, दि. १२ ऑक्टोबर, २०२५ रोजी मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामीण भागासह बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्राचा समावेश असून, ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन “पोलिओमुक्त समाज” या उद्दिष्टाकडे वाटचाल होणार आहे.
जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी व्यापक नियोजन केले आहे.
मोहिमेचे तपशील:
• लसीकरण दिनांक: रविवार, १२ ऑक्टोबर २०२५
• लक्ष्य गट: ५ वर्षांपर्यंतची सर्व बालके
• एकूण लाभार्थी:
o ग्रामीण भाग (अंबरनाथ, कल्याण, शहापूर, भिवंडी व मुरबाड) – १,३१,११० बालके
o बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्र – ६८,८३३ बालके
o एकूण: १,९९,९४३ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.
• एकूण लसीकरण केंद्रे (बुथ): १,८७५
• सहभागी कर्मचारी: ४,७९२
या मोहिमेसाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती शिंदे यांनी समन्वय साधला असून, ठाणे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित सहभाग या मोहिमेत आहे.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी ठाणे, रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, तसेच डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय ठाणे यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की,“प्रत्येक बालकाला पोलिओच्या लसीचे दोन थेंब देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. लसीकरणाद्वारेच आपण आपल्या मुलांचे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करू शकतो.”
सर्व पालकांनी आपल्या बालकांना नजीकच्या लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर