पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानची बांगलादेशवर ५ विकेट्सने मात
अबू धाबी, ९ ऑक्टोबर (हिं.स.) - तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव करून १-० अशी आघाडी घेतली. चांगल्या गोलंदाजीनंतर रहमत शाह आणि रहमानउल्लाह गुरबाज यांच्या अर्धशतकांमुळे अफगाण संघाला ४७.१
राशिद खान


अबू धाबी, ९ ऑक्टोबर (हिं.स.) - तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव करून १-० अशी आघाडी घेतली. चांगल्या गोलंदाजीनंतर रहमत शाह आणि रहमानउल्लाह गुरबाज यांच्या अर्धशतकांमुळे अफगाण संघाला ४७.१ षटकात २२२ धावांचे लक्ष्य सहज गाठता आले.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात केली. वेगवान गोलंदाज अझमतुल्लाह उमरझाईने सुरुवातीलाच जोरदार धक्के दिले. ज्यामुळे यजमान संघाला मागे टाकण्यात त्यांना यश आले. त्यांचे तीनही फलंदाज फक्त ५३ धावांवर बाद झाले. त्यानंतर तौहिद हृदयॉय ५६ धावा आणि मेहदी हसन मिराजने ६० धावा करत चौथ्या विकेटसाठी १०१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सावरला.

पण एका चुकीमुळे तौहिद धावबाद झाला आणि बांगलादेशचा डाव डळमळीत झाला. राशिद खानने मिराजला एलबीडब्ल्यू केले आणि आपली २०० वी एकदिवसीय विकेट घेतली. त्याने झाकीर अली आणि नुरुल हसन यांना झटपट बाद केले. राशिदने ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. तर ओमरझाईने ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा संघ ४८.५ षटकांत २२१ धावांतच सर्वबाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या सलामी जोडीने दमदार सुरुवात केली. इब्राहिम झद्रान आणि रहमानउल्लाह गुरबाज यांनी पहिल्या १० षटकांत ५० धावा केल्या होत्या. झद्रान २५ धावांवर बाद झाला, तर गुरबाजने ५० धावा केल्या. रहमत शाहनेही ५० धावा केल्या. आणि आपल्या संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande