आर्क्टिक बॅडमिंटन ओपन : लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात
हेलसिंकी, ९ ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय बॅडमिंटनपटू थरुन मन्नेपल्लीने आर्क्टिक ओपन २०२५ मध्ये भारताच्या पुरुष एकेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याने जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा पराभव केला. दरम्यान, लक्ष्य सेनला
लक्ष्य सेन


हेलसिंकी, ९ ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय बॅडमिंटनपटू थरुन मन्नेपल्लीने आर्क्टिक ओपन २०२५ मध्ये भारताच्या पुरुष एकेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याने जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा पराभव केला. दरम्यान, लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत आणखी एक निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

जगात ४६ व्या क्रमांकावर असलेल्या मन्नेपल्लीने सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आणि पोपोव्हचा ११-२१, २१-११, २२-२० असा पराभव केला. एक तास आणि आठ मिनिटे चाललेल्या रोमांचक सामन्यातत्याने निर्णायक गेममध्ये चार मॅच पॉइंट वाचवून ऐतिहासिक विजय मिळवला.आता उप -उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या कोकी वातानाबेशी होणार आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिंपिक उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लक्ष्य सेनला पाचव्या मानांकित जपानच्या कोडाई नारोकाकडून २१-१५, २१-१७ ने पराभव सहन करावा लगाला. ५७ मिनिटांच्या या सामन्यात लक्ष्य सुरुवातीपासूनच मागे पडला होता आणि पहिल्या गेमच्या शेवटी ६-११ असा पिछाडीवर होता. दुसऱ्या गेममध्ये त्याने काही प्रतिकार केला, परंतु ब्रेकनंतर नारावकाने सावरले, ज्यामुळे लक्ष्यला फक्त सात गुण मिळवता आले. हा लक्ष्यचा नारावकाविरुद्धच्या आठ सामन्यांमधील सहावा पराभव आणि २०२५ मध्ये त्याचा १० वा पहिल्या फेरीतील पराभव होता. पण गेल्या महिन्यात हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचून त्याने आपल्या खेळातील चमक दाखवली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande