लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
अहमदपूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाने तालुका प्रमुख दत्ता हेंगण यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तहसीलदार उज्वला पांगरकर यांना ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करुन, हेक्टरी ५० हजाराची मदत करा या सह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टीमुळे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमुक्त करून ७/१२ कोरा करा,ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या,जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज ५० हजार जाहीर करा,कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज हेक्टरी १ लाखाची मदत करा, सोयाबीनची नोंदणी ऑनलाइन सुरू करून दिवाळीपूर्वी हमीभावाने नाफेडची खरेदी सुरू करा,जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावा प्रमाणे भाव देऊन खरेदी करण्यास भाग पाडा,रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत खत- बियाण्यांसाठी हेक्टरी २५ हजाराची मदत करा,अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखाची मदत करा, खरीप हंगामातील पिक विमा सर्व निकष कमी करुन मंजूर करा व तात्काळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा,पीक विम्याची सर्व रक्कम भरून न घेता १ रुपया मध्ये पिक विमा भरुन घेण्याचे जाहीर करा, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सामुग्रह ५० हजार अनुदान बँकेच्या चुकीमुळे मिळाले नाही त्यांना तात्काळ अनुदान द्या, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत राशनच्या माध्यमातून गहू,तांदूळ,दाळ द्या
वरील मागण्या तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्या.
अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. धरणे आंदोलना दरम्यान गणेश माने, सिध्देश्वर औरादे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या होत असलेले हाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भुमिका या बाबतीत भावना व्यक्त केली.
या निवेदनावर शिवसेना जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर औरादे, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, तालुका प्रमुख दत्ता हेंगणे, तालुका संघटक तथा एस टी कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, नग
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis