लातूर जिप आणि पंस निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालयां
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध


लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांनी या प्रारूप मतदार यादीचे अवलोकन करावे. तसेच यादीबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १४ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत लातूर जिल्हाधिकारी कार्यालय अथवा संबंधित तहसील कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande