‘एक दिवाने की दिवानियत’चा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘सनम तेरी कसम’ सारख्या भावनिक प्रेमकथेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा जुनूनी प्रेमीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा नवा सिनेमा ‘एक दिवाने की दिवानियत’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला अ
Rane


मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

‘सनम तेरी कसम’ सारख्या भावनिक प्रेमकथेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा जुनूनी प्रेमीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा नवा सिनेमा ‘एक दिवाने की दिवानियत’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरने जोरदार धुमाकूळ घातला आहे.

सुमारे दोन अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये हर्षवर्धन एक गंभीर, भावनिक आणि वेडसर प्रेमात गुंतलेला व्यक्ती साकारताना दिसतो. या चित्रपटात त्याच्या सोबत अभिनेत्री सोनम बाजवा मुख्य भूमिकेत असून, दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवते.

चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. त्यांच्या खास शैलीत त्यांनी इमोशन, लव्ह आणि इंटेन्स ड्रामाचे उत्कृष्ट मिश्रण साकारले आहे.

ट्रेलरपूर्वीच या चित्रपटाचा टीझर आणि गाणी प्रदर्शित झाले होते, ज्यांना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेषतः टायटल ट्रॅक ‘एक दिवाने की दिवानियत’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या गाण्यांमुळे चित्रपटाची भावनिक पार्श्वभूमी आधीच चाहत्यांच्या मनात ठसली आहे.

हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, त्याच दिवशी आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘थामा’ हा सिनेमा देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांमध्ये थरारक स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

तथापि, ‘एक दिवाने की दिवानियत’च्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरून असे स्पष्ट दिसते की हा सिनेमा प्रेक्षकांच्या हृदयात आपली जागा पक्की करण्यास सज्ज झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande