इंडिया इन्क्लुडेड ऑन कॅम्पस केस स्टडी स्पर्धेचा गोदरेज डीईआय लॅबकडून समारोप
मुंबई, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। विविधता, समता आणि समावेशकतेला (DEI) प्राधान्य देणारा गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा उपक्रम - गोदरेज DEI लॅबने गेल्या महिन्यात भारतातील टॉप बी-स्कूलमध्ये DEI संकल्पनेबद्दल संवाद तसेच कल्पनांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय केस स
मुंबई


मुंबई, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। विविधता, समता आणि समावेशकतेला (DEI) प्राधान्य देणारा गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा उपक्रम - गोदरेज DEI लॅबने गेल्या महिन्यात भारतातील टॉप बी-स्कूलमध्ये DEI संकल्पनेबद्दल संवाद तसेच कल्पनांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय केस स्टडी चॅलेंजची घोषणा केली. या उपक्रमाचा आज एका भव्य कार्यक्रमाने समारोप झाला. यात विजेते ठरलेल्या IIM त्रिचीची घोषणा करण्यात आली.

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या सर्वसमावेशक मूल्यांना कॅम्पसमध्ये घेऊन जाण्यासाठी तसेच DEI आव्हानांवर उद्याच्या नेतृत्वासोबत नवीन, कृतीशील उपाय तयार करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील गोदरेज वन येथे झालेल्या अंतिम फेरीसाठी IIM त्रिची, SIBM पुणे, IIM मुंबई आणि IIM लखनऊ येथील चार संघ एकत्र आले. अधिकाधिक महिलांना संधी देणे आणि त्या दीर्घकाळ कामावर टिकून राहतील यासाठी प्रयत्न करणे या कॉर्पोरेट इंडियामधील महत्त्वाच्या आणि प्रमुख आव्हान असलेल्या विषयावरील नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी सादर केल्या. तसेच महिलांचे प्रतिनिधित्व वाढवून कामाच्या जागा या अधिक संतुलित आणि सर्वसमावेशक व्हाव्यात यासाठी देखील त्यांनी त्यांची कृतीशील धोरणे मांडली.

सादरीकरणाच्या अवघड फेरीनंतर, आयआयएम त्रिची या स्पर्धेचे विजेते ठरले. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमधील वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या ज्युरीने चार निकषांच्या आधारे या स्पर्धेचा निकाल दिला: नवोन्मेष, व्यवहार्यता, संशोधन आणि गोदरेज मूल्यांचे पालन. गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटच्या व्यवसायाचा विचार करत, कृषी क्षेत्रातही स्त्री-पुरुष समानता मजबूत करण्यासाठी संबोधित करणारे त्यांचे अनोखे उपाय त्यांनी सादर केले. टीम डू आणि डीईआयने अनेक कर्मचारी सर्वेक्षण केले, स्पर्धक बेंचमार्किंग केले, अ‍ॅग्रोव्हेट कर्मचाऱ्यांशी बोलले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि समावेशनाला मूर्त व्यवसाय परिणामाशी जोडण्यासाठी डिझाइन केलेले व्हिडिओ-आधारित प्रात्यक्षिक. अ‍ॅग्रोव्हेटमधील महिला नेत्यांसाठी प्रभावी मार्ग आणि व्यावहारिक सहभाग धोरणे तयार करण्याचा समावेश यात होता.

विजेत्या संघाला 1,00,000 रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. तसेच गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमधील नेत्यांकडून मार्गदर्शनाची संधी देखील त्यांना मिळणार आहे. आयआयएम त्रिचीच्या टीम डू आणि डीईआयमध्ये मुतय्यिब एम खान, विश्वनाथन ए, महिमा सुरेश आणि ईश्वर्या श्री यांचा समावेश होता.

या उपक्रमाबद्दल गोदरेज डीईआय लॅबचे प्रमुख आणि क्विरिस्तानचे लेखक परमेश शहानी म्हणाले, “चांगले काम आणि प्रगती असूनही इंडिया इनकॉर्पोरेशनमध्ये नेतृत्व पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. तसेच ही महिला प्रतिभा टिकवून ठेवणे हे एक प्रमुख संघटनात्मक आव्हान आहे. इंडिया इनक्लुडेड ऑन कॅम्पसद्वारे, आम्ही यासारख्या विषयांवर गंभीर चर्चा आणि डीईआयशी संबंधित इतर समस्यांवर विचार प्रक्रिया घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे - जिथे उद्याचे नेतृत्व घडते आहे. विद्यार्थ्यांशी या टप्प्यावर संवाद साधल्याने आम्हाला जागरूकता आणि मानसिकता निर्माण करता येते जी या सर्वसामावेशकतेकडे केवळ नैतिक वचनबद्धता म्हणून नाही तर नवोपक्रम आणि शाश्वत व्यवसाय वाढीची धोरणात्मक सक्षमकर्ता म्हणून पाहते. सहभागींचा दृष्टिकोन आणि उत्साह भारतातील कार्यस्थळांसाठी अधिक सर्वसमावेशक भविष्याचे आश्वासन देते.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande