पाटणा, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ५१ उमेदवारांचे नावे घोषित करण्यात आली आहेत. या यादीत अॅडव्होकेट वाय. बी. गिरी, भोजपुरी अभिनेता रितेश पांडे यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे समाविष्ट आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांची नात जगरिती ठाकूर यांना मोरवा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच सदर उमेदवार यादीत 8 मुस्लिम उमेदवार असून अनुसूचित जातीचे 7 आणि सामान्य प्रवर्गातील 8 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. पटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह, प्रदेशाध्यक्ष मनोज भारती, माजी केंद्रीय मंत्री आर.सी.पी. सिंह आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. बिहार विधानसभा निवडणुकीतील एकूण 243 जागांवर, 6 व 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. प्रशांत किशोर राघोपूर येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील.
यासोबतच जन सुराज पक्षतर्फे रघुनाथपूर येथून राहुल कीर्ती सिंह, लौरिया – सुनील कुमार,दरभंगा – सत्येंद्र कुमार यादव, बेनीपट्टी – मोहम्मद परवेज आलम, बेगूसराय – सुरेंद्र कुमार साहनीवाल्मीकिनगर – दीर्घ नारायण प्रसाद यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्याशिवाय राज्याच्या हरसिद्धी मतदारसंघातून अवधेश राम, सिकटी – रागिब बबलू, कोचाधामन – अबू अफाक फारूक,पूर्णिया (अमौर) – अफरोज आलम, मधेपुरा (आलमनगर) – सुबोध सुमन, सहरसा – किशोर कुमार मुन्ना, सिमरी बख्तियारपूर – सुरेंद्र यादव, महिषी – शमीम अख्तर, दरभंगा – आर. के. मिश्रा,मीनापुर – तेजनारायण साहनी, गोपालगंज – डॉ. शशिशेखर सिन्हा, भोरे – प्रीती किन्नर, मांझी – वाय. बी. गिरी, छपरा – जे. पी. सिंह, परसा – मुसाफिर महतो, सोनपूर – चंदन मेहता, कल्याणपूर – रामबालक पासवान, मोरवा – डॉ. जगरिती ठाकूर, खगडिया – जयंती पटेल, बेलदौर – गजेंद्र कुमार सिंह निषाद, पीरपैंती – घनश्याम दास, बेलहर – ब्रजकिशोर पंडित,परबत्ता – विनय कुमार बरुण, अस्थावा – लता सिंह, बिहारशरीफ – दिनेश कुमार, नालंदा – कुमार पूनम सिन्हा, कुम्हरार – प्रा. के. सी. सिन्हा, आरा – डॉ. विजय गुप्ता, चेनारी – नेहा नटराज, करगहर – रितेश पांडे (अभिनेता), नबीनगर – अर्चना चंद्रा यादव, इमामगंज – डॉ. अजीत कुमार, बोधगया – लक्ष्मण मांझी यांचा समावेश आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी