नाशिक - गुन्हेगारांनी न्यायालयात जाताना दिल्या घोषणा
नाशिक, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। - शहरामध्ये होत असलेल्या गुन्हेगारांच्या धरपकडी नंतर गुन्हेगारांना ज्यावेळेस न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी गुरुवारी या गुन्हेगारांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन पोलिसांनी केलेल्या का
नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला गुन्हेगारांनी न्यायालयात जाताना दिल्या घोषणा


नाशिक, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। - शहरामध्ये होत असलेल्या गुन्हेगारांच्या धरपकडी नंतर गुन्हेगारांना ज्यावेळेस न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी गुरुवारी या गुन्हेगारांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईचा समर्थनच केला आहे. दरम्यान या आरोपींना 12 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

शहरांमध्ये काही दिवसापासून सातत्याने खून दरोडे यासारख्या घटना सुरूच आहेत. यामध्ये पोलिसांनी आरपीआयचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली होती. तर दुसऱ्या एका प्रकरणांमध्ये पोलिसांनी अलीकडच्या काळातच भाजपामध्ये प्रवेश केलेले कामगार नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांना अटक करण्यात आलेली होती. या सर्व गुन्हेगारांना आज गुरुवारी न्यायालया त दुपारी नेण्यात आले त्यावेळी या सर्व आरोपींनी नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या आणि पोलिसांच्या कारवाईला आपले समर्थन आहे आपल्यावरील झालेली कारवाई ही योग्य आहे अशी भूमिका घेतली. यामुळे शहरांमध्ये जी गुन्हेगारी वाढू पाहत आहे. तिला मात्र एक प्रकारे सह बसला आहे या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande