तंबाखूसह पान मसाल्याचा दोन कोटींचा साठा जप्त
धुळे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.) - महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा सुमारे एक कोटी ९२ लाख ९९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल नरडाणा व शिंदखेडा येथील पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकाच्या हाती लागला असून, पथकाने दोन ट्रकचालकांना अटक केल
तंबाखूसह पान मसाल्याचा दोन कोटींचा साठा जप्त


धुळे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.) - महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा सुमारे एक कोटी ९२ लाख ९९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल नरडाणा व शिंदखेडा येथील पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकाच्या हाती लागला असून, पथकाने दोन ट्रकचालकांना अटक केली आहे. ही कारवाई मध्यरात्रीनंतर सार्वे शिवारातील गोविंद पेट्रोलपंपाजवळ करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील सार्वे शिवारात गोविंद पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरीत्या दोन ट्रक उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने छापा टाकून दोन्ही ट्रक (एमपी १३, जीबी २८२२ आणि एमएच २७, डीटी १३४३) ताब्यात घेतले. ट्रकमधून महाराष्ट्रात बंदी असलेला राजनिवास, जाफराणी जर्दा, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आदी सुगंधित तंबाखूचा मोठा साठा मिळून आला. ट्रकचालक अमजद अजीज खान (वय ४३, रा. रतलाम, मध्य प्रदेश) व अशफाक अब्बास खान (वय ४७, रा. राजगड, जि. धार, मध्य प्रदेश) हे हा माल शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने चोरटी वाहतूक करत असल्याचे उघड झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande