जळगावात 25 किलो गांजा जप्त
जळगाव, 9 ऑक्टोबर (हिं.स.)रावेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती कळताच पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. मेहरबान रहेमान तडवी या शेतकऱ्याने हा प्रताप केल्याचे समोर आले आले असून त्याला अटक करुन गुन्हा द
जळगावात 25 किलो गांजा जप्त


जळगाव, 9 ऑक्टोबर (हिं.स.)रावेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती कळताच पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. मेहरबान रहेमान तडवी या शेतकऱ्याने हा प्रताप केल्याचे समोर आले आले असून त्याला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तुरीच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. या शेतातून २५ किलो वजनाचा १ लाख ७० हजार ३०६ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने लालमाती-सहस्त्रलिंग रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अचानक धाड टाकून २५ किलो वजनाचा सुमारे १.७ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मेहरबान तडवी याला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande