झी मराठीच्या नायिकांनी सादरीकरणातून जिवंत केला इतिहास
मुंबई, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास अनुभव, नाविन्यपूर्ण सादरीकरण, अविस्मरणीय परफॉर्मन्सेस आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे अनेक सरप्राइजेस. यावर्षी, या कार्यक्रमाच विशेष आ
झी मराठीच्या नायिकांनी सादरीकरणातून जिवंत केला इतिहास


झी मराठीच्या नायिकांनी सादरीकरणातून जिवंत केला इतिहास


झी मराठीच्या नायिकांनी सादरीकरणातून जिवंत केला इतिहास


झी मराठीच्या नायिकांनी सादरीकरणातून जिवंत केला इतिहास


मुंबई, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास अनुभव, नाविन्यपूर्ण सादरीकरण, अविस्मरणीय परफॉर्मन्सेस आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे अनेक सरप्राइजेस. यावर्षी, या कार्यक्रमाच विशेष आकर्षण म्हणजे नायिकांचा खास परफॉर्मेंस एका ऐतिहासिक थीमवर होणार आहे. जो महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीच्या वारशाला आणि इतिहासातील अस्तित्वाला सलाम करणार आहे. या खास अ‍ॅक्टमध्ये, भावना - छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. पारू - संत मुक्ताबाई, कमळी - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या रूपात, तारिणी - राणी लक्ष्मीबाईंच्या रूपात, - अनाथांची माय सिंधुताईंच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सर्वांना एकत्र आणणार आहे मीरा आणि जान्हवी सावली जे सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहे.

आपला अनुभव सांगताना कमळी म्हणजेच विजया बाबर म्हणाली आमचं शूट साधारण रात्री २ वाजता सुरू झालं. हा अ‍ॅक्ट आम्ही समाजात मोठे योगदान देणाऱ्या महान स्त्रियांना वंदन म्हणून सादर करत आहोत. मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते. त्या शक्तिशाली व्यक्तिमत्वांच्या रूपात सादरीकरण करत असताना, आम्हाला स्टेजवर एक वेगळीच उर्जा आणि स्त्रीशक्तीचा अनुभव आला. प्रत्येक सादरीकरणामागे एक संदेश आहे. हा संपूर्ण अ‍ॅक्ट त्या महान स्त्रियांच्या संघर्षकथा सांगणारा होता, ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि धैर्याने समाजात अनेक बदल घडवले. त्यांच्या लढ्यामुळेच आपण स्त्रियां आज शिक्षण घेऊ शकतो, आपले अधिकार सांगू शकतो, स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. माझी प्राप्‍ती, शरयु, आणि अक्षया ताईंसोबत चांगली मैत्री झाली आणि आम्ही खूप एन्जॉय करत ऍक्ट शूट केला.

या वर्षीचा झी मराठी पुरस्कार सोहळा केवळ मालिकांचा गौरव नसून, महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहास आणि स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा कार्यक्रम ठरणार आहे. या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हायला विसरू नका 'झी मराठी अवॉर्ड्स' २०२५, ११ आणि १२ ऑक्टोबरला संध्या ७वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande