
भाजप आमदार सुरेश धस यांची माहिती
बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली होती. अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे
आपण केलेल्या
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री महोदयांनी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या विशेष तपास पथकाचे नेतृत्व मागणीनुसार एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी करणार असून, त्यांच्या सोबत अनुभवी पोलिस अधिकारी, गुन्हे अन्वेषण तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक सल्लागारांचा समावेश असेल. हे पथक सर्व संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि तपास नोंदींचा सखोल अभ्यास करून वास्तव परिस्थिती उघड करण्याचे काम करणार आहे. असे सुरेश धस यांनी आज सांगितले
या निर्णयामुळे डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील सत्य नक्कीच समोर येईल आणि न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी पूर्ण खात्री आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis