सोलापूर-पोलिसांनी 36 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)मुंबईतून मेफॅड्रीन (एमडी) ड्रग्ज आणून तो सोलापुरात विक्री करणाऱ्या पुण्याच्या आरोपीस सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. एसटी स्टॅण्ड परिसरात छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाख आठ हजार रुप
सोलापूर-पोलिसांनी 36 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले


सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)मुंबईतून मेफॅड्रीन (एमडी) ड्रग्ज आणून तो सोलापुरात विक्री करणाऱ्या पुण्याच्या आरोपीस सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. एसटी स्टॅण्ड परिसरात छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाख आठ हजार रुपये किंमतीचे 36 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मोहम्मद अझहर हैदरसाहेब कुरेशी (वय 37, रा. भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट कॅम्प, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईकरिता सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शामकांत जाधव आणि बापू साठे यांना माहिती मिळाली की, शहरातील एस.टी. स्टॅण्ड परिसरात एक इसम अंमली पदार्थाचा साठा घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहे. त्या अनुषंगाने जाधव आणि त्यांच्या पथकाने एसटी स्टॅण्ड परिसरातून त्या इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 36 ग्रॅम पांढरी पावडर जप्त केली. फॉरेन्सिक टिमने त्या पावडरची तपासणी केली असता ते एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. मोहम्मद कुरेशी याच्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande