प्रक्षाळपूजेनंतर श्रीविठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन पूर्ववत
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्तिकी एकादशी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन मिळावे, म्हणून श्री विठ्ठल- रुक्मिणीचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात आले. प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठल- र
श्रीविठ्ठल-रूक्मिणी


सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्तिकी एकादशी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन मिळावे, म्हणून श्री विठ्ठल- रुक्मिणीचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात आले. प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठल- रुक्मिणीची पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन पूर्ववत सुरू झाले आहे. चांगला मुहूर्त पाहून श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा करण्यात आली.

ही पूजा मंदिर समिती सदस्या ॲड. माधवीताई निगडे, शकुंतलाताई नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजेच्या सुरुवातीला प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीस पहिले स्नान घालण्यात आले.

प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी 2 पदरी, मोत्याची कंठी 1 पदरी पदकास मोती, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्त्य जोड, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तुळशीच माळ 1 पदरी, शिरपेच लहान 10 लोलक असलेला, शिरपेच मोठा 2 लोलक असलेला, तोडे जोड, जवेची माळ 2 पदरी, एकदाणी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेे आहेत. तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्य जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande