
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।कृषी विभागाने नवे बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित केले असून, यापुढील सर्व उपक्रमांत त्याचा वापर केला जाणार आहे.
सन १८८१ च्या फेमीन कमीशन ने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत कृषी विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे.
आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीचे बोधचिन्ह रचना, दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागले. त्यामुळे खुली स्पर्धा घेण्यात आली. त्यातून भुसावळचे वीरेंद्र भाईदास पाटील यांनी सुचवलेले बोधचिन्ह, परभणी येथील सिद्धी भारतराव देसाई यांचे घोषवाक्य निवडण्यात आले. त्यानुसार समितीद्वारे विचारविनिमय होऊन कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित करण्यात आले. कृषी विभागाचे नवे कृषी कल्याण कर्तव्यम बोधचिन्ह व शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी घोषवाक्य यापुढे कृषी विभागाच्या सर्व उपक्रमामध्ये वापरण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे