अकोला - शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ऍग्रीस्टॅक नोंदणी केली नसेल, त्यांनी ती तत्काळ करून घेण्याचे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दि. १४ ऑक
अकोला - शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन


अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ऍग्रीस्टॅक नोंदणी केली नसेल, त्यांनी ती तत्काळ करून घेण्याचे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार सर्व शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

ऍग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेली रक्कम तात्काळ जमा करण्यात येत आहे. ऍग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना ई- केवायसी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला गाव नमूना क्र. ७/१२ उतारा व आधारपत्रासह आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली ऍग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे अकोला जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande