खासदार अनुप धोत्रे यांनी मानले फडणवीस यांचे आभार!
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अकोला येथील विमानतळ तातडीने सुरू व्हावे याकरिता युवा खासदार अनुप धोत्रे यांनी निवडून आल्यावर सुरुवातीपासूनच सातत्याने प्रश्न केंद्रीय व राज्य शासन दरबारी लावून धरला विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता अतिरिक्त जमीन संपादित क
प


अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अकोला येथील विमानतळ तातडीने सुरू व्हावे याकरिता युवा खासदार अनुप धोत्रे यांनी निवडून आल्यावर सुरुवातीपासूनच सातत्याने प्रश्न केंद्रीय व राज्य शासन दरबारी लावून धरला विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता अतिरिक्त जमीन संपादित करणे अत्यंत आवश्यक होते त्याशिवाय विस्तारीकरणाचे काम हाती घेणे शक्य नाही हे लक्षात घेऊन खासदार धोत्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र।फडणवीस यांना गळ घालून जमीन संपादनाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, त्याकरिता शासन स्तरावर बैठकी सुद्धा घेण्यात आल्या या सर्व प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणजे राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्ष खाली विमानचालन क्षेत्र व राज्यातील विमानतळा संदर्भात असलेल्या शक्ती प्रधान समितीची बैठक होऊन अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता जमिन संपादनाकरिता सुमारे 209 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास शासनाने मान्यता दिल्याने खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांचे समस्त जिल्हा वासियांतर्फे जाहीर आभार मानले, जमीन संपादनामुळे विमानतळ विस्तारीकरणाचा पहिला टप्पा सफल झाला असून विमानतळ विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू व्हावे याकरिता अर्थसंकल्पांमध्ये तरतूद करून विमानतळ सुरू करण्याचा निर्धार खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरी हवाई मंत्री केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांना विमानतळ सुरू करण्यासाठी पुढील सर्व मंजुरी व सोपस्कार पुर्ण करण्यासाठी विनंती केली आहे, अकोला विमानतळ सुरू व्हावे याकरिता अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला अकोला जिल्ह्यातील उद्योजक तसेच वाशिम बुलढाणा येथील उद्योगांना चालना मिळावी याकरिता व्यापारी दृष्टीने तसेच विदर्भाची पंढरी शेगाव येथे येणाऱ्या भक्तांकरीता सुविधा निर्माण व्हावी पर्यटनच्या दृष्टीने विकास व्हावा याकरिता अकोला विमानतळ सुरू व्हावे अशी कायम मागणी होती याकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार प्रकाशजी भारसाकडे आमदार हरीशजी पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आदींनी शासनाकडे मागणी कायम रेटून धरली होती अकोला विमानतळासाठी भुसंपादन करून विस्तारीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा अध्यादेश सुद्धा काढला आहे,

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande