सेवानिवृत्तांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता. परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टमनकडून घरपोच क
सेवानिवृत्तांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार


अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता. परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टमनकडून घरपोच किंवा पोस्ट कार्यालयातून मिळवण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

`‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ हे ब्रीदवाक्य घेऊन डाक विभागाच्या वतीने हे प्रमाणपत्र घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हयातीचे प्रमाणपत्र आता पोस्टातून आणि घरपोच सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.` केंद्र आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक तसेच महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी आदींना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सदर करावे लागते. याशिवाय विविध शासकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा या प्रमाणपत्राची गरज भासते.

हयातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्या बँकेचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर या तीन बाबी महत्वाच्या आहेत. या तीन बाबीची पूर्तता केल्यास सबंधित व्यक्तीला घरपोच हयातीचे प्रमाणपत्र डाक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. _हयातीच्या प्रमाणपत्रासाठी सेवानिवृत्तीधारकांना जीएसटीसह ७० रुपये द्यावे लागतात.डाक विभागाच्या वतीने पेन्शन धारकांना घरपोच हयातीचे प्रमाणपत्र पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रवर डाकघर अधिक्षक यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande