
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात ‘सरदार 150’ एकता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अकोला शहरात उद्या (11 नोव्हेंबर) जिल्हास्तरीय एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पदयात्रेचा शुभारंभ सकाळी 8.30 वा. वसंत देसाई क्रीडांगण येथून होईल. पुढे अग्रसेन चौक, शहिद अब्दुल हमीद चौक, शहर कोतवालीकडून जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होईल. पदयात्रेदरम्यान आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण होईल. सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा उपक्रम यशस्वी करावा. अकोलेकरांनी मोठ्या संख्येने एकता पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना व जिल्हा प्रशासनाने केले आहे. या उपक्रमात दि. 12 नोव्हेंबर रोजी मूर्तिजापूर येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे