अकोला : आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत 12 ऑगस्ट ला अतिक्रमण निर्मूलन च्या नावाखाली हिंगणा येथील नोंदणीकृत जयराम गोरक्षण येथील गाईंचा गोठा, चाऱ्याचे गोडाऊन ची तोडफोड आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे
P


अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत 12 ऑगस्ट ला अतिक्रमण निर्मूलन च्या नावाखाली हिंगणा येथील नोंदणीकृत जयराम गोरक्षण येथील गाईंचा गोठा, चाऱ्याचे गोडाऊन ची तोडफोड आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विदृपीकरण त्याच बरोबर 100 गाई व गोवंश यांची अपहरण करणाऱ्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा क्रीडाधिकारी यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली. सदर प्रकरणात माहिती अधिकारामार्फत माहिती गोळा केली असता त्यामध्ये तिन्ही विभागाने आम्ही कारवाई केली नाही असे नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग कडे दाद मागितली असता आयुक्त मनपा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्राद्वारे सदर प्रकरणातील आपला अहवाल सादर करावा व सुनवणी होई पर्यंत प्रकरण यथास्थितीत ठेवावे असे आदेश दिले आहेत अशी माहिती देण्यात आली. आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वोच न्यायालयात दाद मागू असे कळविण्यात आले.. आणि तिन्ही अधिकारी यांवर गुन्हे दाखल होई पर्यंत शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, पुरषोत्तम अहिर, वैभव खडसे, जय तायडे, नागेश उमाळे, मिलिंद दामोदर, सम्राट तायडे, सुगत डोंगरे, अमन गवई,सचिन शिराळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande