
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। अकोला जिल्हा परिषद मधील मॅनेज काम वाटप सभेवर वंचित युवा आघाडीने आक्षेप घेऊन सोमवारी कार्यकारी अभियंत्यास काळे फासण्यासाठी जाताच युवा आघाडीचे दणक्याने४ नोव्हेंबर ची जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द करण्यात आली आहे.जिल्हा परिषद मध्ये कामकाज करताना पुन्हा भ्रष्टाचार करू नका अशी तंबी देणारी ओळ कार्यकारी अभियंता ह्यांचे पाठीमागे लिहून शिस्तीत राहण्याचा बांधकाम विभागाला इशारा देण्यात आला.
अकोला जिल्हा परिषदेच्या काम वाटप सभेत केवळ २२ कामे दाखवून २०० पेक्षा अधिक ८ कोटीची कामे नियमबाह्य मंजूर करण्याचा घाट घालण्यात आला होता.त्यावर जिल्हा परिषद मधली कमिशनखोरी बंद करा अन्यथा कार्यकारी अभियंता पी पी इंगळे ह्यांना सोमवारी काळे फासण्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला होता.मात्र तीच सभा रेटून नेण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने चालवला होता.काळे फासण्याचे अंमलबजावणी साठी युवा आघाडी पदाधिकारी एशियन चा काळा पेंट घेऊन कार्यकारी भियंत्याच्या दालनात पोहोचले आणि दोन ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्यावर कार्यकरी अभियंता यानी कामवाटप समिती प्रक्रिया रद्द चे करण्यास टाळाटाळ करीत असल्याने युवा आघाडीने त्यांना आधी उपमुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांचे दालनात आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचे दालनात आंदोलक ह्यांना नेले.परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांनी अधिकारी बचाव ची भूमिका घेतल्याने युवा आघाडीचे आंदोलक ह्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचे चेंबर मधून बहिर्गमन करून कार्यकारी अभियंता ह्यांचे चेंबर मध्ये प्रवेश करून पुन्हा ठिय्या सुरू केला.
पत्र मिळे पर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार युवा आघाडी पदाधिकारी यांनी केला होता.त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिस बोलवत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला भीक न घालता अनेक तास ठिय्या आंदोलन सुरू होते. अखेर जिल्हा परिषद प्रशासन ताळ्यावर आले आणि अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ह्यांचे पत्र आणि वंचित बहुजन युवा आघाडी मोर्चा ह्यामुळे दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ ची काम वाटप सभा रद्द करण्यात आल्याचे पत्र कार्यकारी अभियंता ह्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांना देण्यात आले.
त्यानंतर कार्यकारी अभियंता ह्यांचे चेंबर मध्ये पुन्हा भ्रष्टाचार करू नकाअसे प्रदेश महासचिव यांनी कार्यालयाच्या भिंतीवर लिहीत प्रेमाची समज दिली.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील आणि जिल्हा युवा महासचिव राजकुमार दामोदर ह्यांचे नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.ह्यावेळी आंदोलनात युवा आघाडी प्रदेश महासचिवराजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्षश्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर,
महानगर अध्यक्ष वैभव खडसे, मिलिंद दामोदर,आशिष रायबोले, सम्राट तायडे,सुगत डोंगरे, माजी जि प सदस्य गोपाल कोल्हे,सचिन शिराळे, जय तायडे, नागेश उमाळे, सुरेंद्र तेलगोटे, नितीन वानखडे,राजदार खान, अमोल वानखडे, श्रीकृष्ण देवकुणबी, सुमेध खंडारे, पुरुषोत्तम अहिर, माजी जि प सदस्य योगेश वडाळ,अमन गवई,समीर पठाण,उमेश लबडे, महेंद्र शिरसाट,आकाश गवई, आकाश जंजाळ, सचिन सरकटे, श्याम काळे,प्रदिप इंगळे,विश्वा खंडारे,अभी अवचार,अतिश अवचार, अमोल डोंगरे, सचिन सरकटे युवा आघाडी पदाधिकारी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे