रत्नागिरी : वेरळ येथे १४ नोव्हेंबरपासून लक्ष्मीकांताचा वार्षिकोत्सव
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : वेरळ (ता. लांजा) येथील श्री देव लक्ष्मीकांताचा वार्षिक कार्तिकोत्सव १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. यावर्षी उत्सवाचे व्यवस्थापन अरुण देव, सुभाष देव (पुणे), अरविंद देव (रतलाम) आणि देव कुटुंबातील
रत्नागिरी : वेरळ येथे १४ नोव्हेंबरपासून लक्ष्मीकांताचा वार्षिकोत्सव


रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : वेरळ (ता. लांजा) येथील श्री देव लक्ष्मीकांताचा वार्षिक कार्तिकोत्सव १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

यावर्षी उत्सवाचे व्यवस्थापन अरुण देव, सुभाष देव (पुणे), अरविंद देव (रतलाम) आणि देव कुटुंबातील इतर मंडळी करणार आहेत. उत्सवात दररोज रात्री ८.३० वाजल्यापासून आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्पांजली, कीर्तन, दीपोत्सव पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहेत.

उत्सवात कीर्तन सेवा हभप दत्तात्रय उपाध्ये (वालावल, ता. कुडाळ) करणार आहेत. त्यांना संवादिनीसाथ योगेश सरपोतदार व तबलासाथ प्रसाद पटवर्धन करणार आहेत. १६ व १७ नोव्हेंबर व १९ व २० रोजी दुपारी १ वाजता सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव साजरा होईल. २० नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

उत्सवासाठी देणगी, उत्सव वर्गणी पाठवायची असल्यास लक्ष्मीकेशव संस्था, वेरळ या नावाने चेकद्वारे पाठवावी. अगर बॅंक ऑफ इंडिया, लांजा शाखा A/C No.140210110015888 & IFSC CODE - BKID0001402 या खात्यावर पाठवावी. उत्सवात येणाऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्थेसाठी उत्सवाला येणाऱ्यांनी सौ. अंजली गुणे (9356948571) व सुरेश गुणे (9049649378) यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande