
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सिंधी समाजाचे इष्ट दैवत असलेले झुलेलाल देवजी यांच्याबाबत रायपूर मधील अमित बघेल यांनी काढलेल्या अपशब्द विरोधात सिंधी समाजाचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया वरती आला यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन बघेल यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नाशिक सिंधी समाजाच्या वतीने छत्तीसगडमधील रायपूर येथील एका राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे इष्ट दैवत असलेल्या झुले लाल देवजी यांच्याबाबत अपशब्द काढले होते या अवमानकारक वक्तव्याचा नाशिक सिंधी समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यालया वरती मोर्चा काढून निषेध करण्यात आला .शेकडो प्रमाणावर सिंधी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. त्यावेळी सिंधी समाजाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला आणि जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले .त्यामध्ये अमित बघेल यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV