नाशिकमध्ये खड्डे चुकवण्याच्या नादात कंटेनर पलटी
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.) परतीचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या अनकवाडे जवळील रेल्वे ओव्हर ब
नाशिकमध्ये खड्डे चुकवण्याच्या नादात कंटेनर पलटी


नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.) परतीचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या अनकवाडे जवळील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ उताराला भला मोठा कंटेनर खड्डे चुकवण्याच्या नादात पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा रस्त्यावर कंटेनर आणण्यात आला.

मनमाड इंदूर - पुणे हा राष्ट्रीय मार्ग मनमाड शहरातून जवळपास नऊ किलोमीटरचा आहे. या मार्गावर रेल्वे ओव्हर ब्रिज असलेल्या उड्डाणपूलावर खड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नेमके याच पुलावर नेमकी वाहतूक कोंडी होत असते. त्यात आता खड्डे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागते. सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. इंदूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावर मनमाड शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने किमान रस्त्यांची तात्पुरती का होईना दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालक आणि जनतेतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande