उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी परभणीत जाहीर सभा
शिवसेनेद्वारे भक्कम मोर्चेबांधणी सुरु : सभेतून शक्तीप्रदर्शन होणार परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे बुधवार 12 नोव्हेंबर रोजी परभणीच्या दौर्‍यावर येणार असून या दौर्‍यात ते जिंतूर
शिवसेनेद्वारे भक्कम मोर्चेबांधणी सुरु : सभेतून शक्तीप्रदर्शन होणार


शिवसेनेद्वारे भक्कम मोर्चेबांधणी सुरु : सभेतून शक्तीप्रदर्शन होणार

परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे बुधवार 12 नोव्हेंबर रोजी परभणीच्या दौर्‍यावर येणार असून या दौर्‍यात ते जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. या सभेच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शक्तीप्रदर्शन व्हावे या दृष्टीने जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रमुख नेतेमंडळींसह पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार अ‍ॅड. सुरेशराव जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, संपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, महिला संपर्क प्रमुख सखूबाई लटपटे, महानगर प्रमुख माणिक पोंढे, महिला जिल्हाप्रमुख गीता सुर्यवंशी, जिल्हा संघटक डॉ. मदनराव लांडगे, उपजिल्हाप्रमुख पप्पू पवार, बाबा काटकर, तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, संदीप लहाने आदींसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख भरोसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या परभणी दौर्‍यामुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून, कार्यकर्त्यांनी एकजुटीने येणार्‍या जाहीर सभेला भव्य स्वरूप द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीदरम्यान झरी सर्कल प्रमुख पदी संदीप बोरकर, मागासवर्गीय विभाग उपजिल्हाप्रमुख पदी मिलिंद खंदारे, तसेच उपशहर प्रमुख पदी पवन कौसडीकर यांना नियुक्तीपत्रे माजी खा. सुरेशराव जाधव, संपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, व जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

सभा मंडपाचे भूमिपूजन ....

जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार्‍या या सभेच्या सभामंडपाचे भूमीपूजन माजी खासदार जाधव, माजी आमदार लहाने, संपर्क प्रमुख लंगोटे आणि आयोजक जिल्हाप्रमुख भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande