परभणी : दुचाकी एमसीवाय वाहनांसाठी एमएच 22 बीजे ही नवीन मालिका (सिरीज) लवकरच सुरु
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी मार्फत दुचाकी एमसीवाय वाहनांसाठी लवकरच एमएच 22 बीजे ही नविन मालिका (सिरीज) सुरू करण्यात येत आहे. तरी इच्छुक नविन वाहन खरेदी करण्या-या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहीत पसंती क्रमांका
परभणी :  दुचाकी एमसीवाय वाहनांसाठी एमएच 22 बीजे ही नवीन मालिका (सिरीज) लवकरच सुरु


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी मार्फत दुचाकी एमसीवाय वाहनांसाठी लवकरच एमएच 22 बीजे ही नविन मालिका (सिरीज) सुरू करण्यात येत आहे. तरी इच्छुक नविन वाहन खरेदी करण्या-या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी DY RTO PARBHANI यांच्या नावे कार्यालयात दि. 11 नोव्हेंबर, 2025 ते 14 नोव्हेंबर, 2025 दुपारी 2.30 पर्यंत सहा. रोखपाल खिडकी क्रमांक 10 वर जमा करावा.

नविन वाहन नोंदणी ही वितरकांच्या स्तरावर होत असल्यामुळे लिलाव दिनांकात व सिराज सुरु करण्याच्या दिनांकात बदल करण्याचे पूर्ण अधिकारी या कार्यालयाकडे आहेत. एका पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासच त्या क्रमांकाचा लिलाव घेण्यात येईल. या बाबत सुचना केवळ कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येतील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त नविन वाहन खरेदी करण्या-या वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande