छ. संभाजीनर - मृद व जलसंधारणावर भर देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवार २.० या शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात मृद व जलसंधारणावर भर द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या
मृद व जलसंधारणावर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी


छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवार २.० या शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात मृद व जलसंधारणावर भर द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जलयुक्त शिवार २.० चा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा जलसंधारण अधिकारी कटके, जिल्हा भूजल अधिकारी जीवन बेडवाल तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. उपविभाग व तालुकास्तरीय अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

जिल्हा जलयुक्त शिवार आराखड्यात ३५२१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात सुधारणा करुन आटा २६८८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ९९कोटी ६५ लक्ष १६ हजार रुपये इतकी या कामांची किंमत आहे,अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या कामांमध्ये मृदसंधारण, जिल्हा परिषद, कृषी विभाग, भुजल विभाग, वन विभाग अशा संस्थांमार्फत कामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, योजनांचे अभिसरण करुन अधिकाधिक कामांचा समावेश करावा. झालेल्या कामांची माहिती पोर्टलवर वेळीच अपलोड करावी. वेळेत व गुणवत्त्तापूर्ण कामे करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande