
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये दहा दिवसांचे (डीजीसीए) मान्यता प्राप्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षाद्वारे ड्रोन उड्डाण नियंत्रण, सर्वेक्षण व आधुनिक शेतीसाठी इत्यादी तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन व प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये तरुणांना विविध क्षेत्रातील व्यावसायिक संधीचे दरवाजे खुले होणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये एकाच वेळी अनेक अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातुन ड्रोन उड्डाण देखभाल, जमीन मोजणी, छायाचित्रण, चित्रफित बनविणे, शेती व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध क्षेत्रातील ड्रोन वापराबाबत सखोल माहिती देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी अमृत संस्थेचे कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजुला, परभणी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुध्द काटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis