पती-पत्नीचा समाजरत्न सन्मान - समाजसेवेसाठी सचिन आणि मंगला डाकी दांपत्य गौरवले
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। समाजातील गरीब, निराधार आणि आदिवासी रुग्णांना वैद्यकीय तसेच मानसिक आधार देत निरंतर सेवा करणाऱ्या पनवेलमधील सचिन डाकी आणि मंगला सचिन डाकी या दांपत्याचा ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन, साहि
पती-पत्नीचा समाजरत्न सन्मान — समाजसेवेसाठी सचिन आणि मंगला डाकी दांपत्य गौरवले


रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

समाजातील गरीब, निराधार आणि आदिवासी रुग्णांना वैद्यकीय तसेच मानसिक आधार देत निरंतर सेवा करणाऱ्या पनवेलमधील सचिन डाकी आणि मंगला सचिन डाकी या दांपत्याचा ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन, साहित्य प्रसार आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साहित्यसंपदा संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त डोंबिवली येथील विनायक मंदिर सभागृहात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हाशिवरे गावचे सुपुत्र सचिन डाकी हे तळोजा येथील टेक्नोवा कंपनीत कार्यरत असून, त्यांची पत्नी सौ. मंगला डाकी या गेल्या २० वर्षांपासून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. या सेवाभावी कार्यातून त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने रुग्णांशी सातत्याने संवाद ठेवत, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कागदपत्रांची पूर्तता करण्यात मदत करणे आणि रुग्ण पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहणे, अशी उल्लेखनीय समाजसेवा केली आहे. आजपर्यंत शेकडो रुग्णांना या दांपत्यामुळे नवजीवन लाभले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत साहित्यसंपदा संस्थेने समाजरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव केला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ अव्हाड, प्रमुख अतिथी म्हणून गझलकार दत्तप्रसाद जोग, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी संस्थेचे संस्थापक वैभव धनावडे म्हणाले, “अशा सेवाभावी व्यक्तींना सन्मान देणे म्हणजे समाजकार्याला नवी प्रेरणा देणे होय.” या सन्मानानंतर डाकी दांपत्याचे पनवेल आणि रायगड परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande