धुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपाचाच झेंडा फडकेल - कुणाल पाटील
धुळे, 10 नोव्हेंबर (हिं.स.) पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपळनेरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. भाजपाचे जिल्हा निवडणूक प्रमुख कुणाल पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष संघटनेत
धुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपाचाच झेंडा फडकेल - कुणाल पाटील


धुळे, 10 नोव्हेंबर (हिं.स.) पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपळनेरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. भाजपाचे जिल्हा निवडणूक प्रमुख कुणाल पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष संघटनेतील पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाणार असून पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्‍वास जिल्हा निवडणूक प्रमुख कुणाल पाटील यांनी व्यक्त केला.

पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पार्टी,पिंपळनेरच्या पदाधिकारी,कार्यकत्यारची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकत्यारशी संवाद साधतांना कुणाल पाटील यांनी सांगितले कि, पिंपळनेर भाजपा निवडणूकीबाबत प्रचंड उत्साह आहे.

विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकत्यारने युतीचा धर्म पाळत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे भाजपाच्या कार्यकत्यारचे कौतुक केले पाहिजे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचे काम करीत आहेत. भाजप कार्यकत्यारनी चिंता करु नये कारण पिंपळनेरसह धुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपाचाच झेंडा फडकेल. पिंपळनेर नगरपरीषदेत प्रत्येक प्रभागात कोण इच्छूक आहे, लोकांची कोणाला पसंती आहे तसेच निवडणूक येण्याच्या क्षमतेनुसारच उमेदवारी दिली जाईल. पिंपळनेर शहरात भाजपाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्‍वास कुणाल पाटील यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande