गडचिरोलीत जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न
गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हास्तरावर जिल्हास्तर युवा महोत
जिल्हा युवा महोत्सव


गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हास्तरावर जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर युवा महोत्सव उद्घाटन प्रमुख अतिथी नितीन गावंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, डॉ. प्रशांत जाखी, प्राचार्य, शासकीय विज्ञान महाविद्यालय, डॉ. अनिता लोखंडे, प्राचार्य, एस. चंद्रा विज्ञान महाविद्यालय, आष्टी, जेष्ठ कलावंत मारोतरावजी इचोडकर व मदन टापरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी सदर युवा महोत्सवातील विविध बाबींचे परिक्षण करण्याकरीता परिक्षक म्हणून डॉ.अनिता लोखंडे, डॉ. राम वासेकर, डॉ. सुरेश शेंडे, डॉ. प्रितेश जाधव, जितेंद्र रायपुरे, डॉ. मंदार पैगनकर, एम.वी. लांडे, शासकीय तंत्र निकेतन, गडचिरोली, संजय घोटेकर, विवेक कहाळे, राकेश चटगुलवार, श्रीमती वैशाली मडावी इत्यादी मान्यवरांनी युवा महोत्सवाअंतर्गत कलाबाबीचे परिक्षक म्हणून यांनी काम पाहीले. सर्व सन्माननिय परिक्षकांना कार्यालयाचे वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांना अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती. युवा महोत्सवात सहभागी युवा युवती, विद्यार्थी यांना टि-शर्टस् वितरीत करण्यात आले.

जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये विविध कला बाबीमध्ये जिल्ह्यातील सुमारे 150 ते 160 कलाकारांनी सहभाग नोंदविला व याप्रसंगी शालेय विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. सर्व कला स्पर्धेचा अंतिम निकाल जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी सायंकाळी सत्रात जाहीर केले व विभागीय स्पर्धेकरीता पात्र ठरलेल्या सर्व कलाकारांना सुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरवर प्राविण्य प्राप्त कलाकारांची नावे खालीलप्रमाणे :-

लोकनृत्य :- मॉडेल डिग्री कॉलेज, गडचिरोली ता.जि. गडचिरोली ग्रुप

लोकगीत :- मॉडेल डिग्री कॉलेज, गडचिरोली ता.जि. गडचिरोली ग्रुप

कथालेखन :- प्रथम - अमर ज्ञानेश्वर भुगे, द्वितीय - प्रतिक क्रिष्णा म्हरसकोल्हे, तृतीय - हर्षल अनिल सावरकर

चित्रकला :- प्रथम - सुरज बंडू गद्दे, द्वितीय - पुजा प्रमोद दुपारे, तृतीय - कृतीका गुरुदेव चापले

वक्तृत्व स्पर्धा :- प्रथम - अरबाज मुस्तफा शेख, द्वितीय - शुभांगी सुरुफाम, तृतीय - हर्षल सावरकर

काव्यलेखन :- प्रथम - अरबाज मुस्तफा शेख, द्वितीय - हर्षल भानारकर, तृतीय - खुशबु नरुले

विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना :- प्रथम - नुतन दलाल ॲन्ड ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली,

द्वितीय - इर्शा काकडे ॲन्ड ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली,

तृतीय - हर्षल सावरकर ॲन्ड ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली,

उपरोक्त प्राविण्यप्राप्त कलाकलाकारांमधून प्रथम क्रमांकाचे/ विभागीय स्पर्धेकरीता पात्र ठरलेले कलाकार भंडारा येथे आयोजीत होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवात गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande