पुणे-गजानन मेहेंदळे जागतिक दर्जाचे इतिहास संशोधक होते - कृष्णगोपाल
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)गेल्या सुमारे एक हजार वर्षात भारतावर असंख्य आक्रमणे झाली, ज्यात असंख्य राष्ट्रभक्तांचे बलिदान झाले. त्यातूनही भक्कमपणे दिमाखाने उभे राहणाऱ्या आपल्या भारताचे सर्वांगीण संशोधन सातत्याने होण्याची गरज आहे, ज्यासाठी गजानन मेहे
पुणे-गजानन मेहेंदळे जागतिक दर्जाचे इतिहास संशोधक होते - कृष्णगोपाल


पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)गेल्या सुमारे एक हजार वर्षात भारतावर असंख्य आक्रमणे झाली, ज्यात असंख्य राष्ट्रभक्तांचे बलिदान झाले. त्यातूनही भक्कमपणे दिमाखाने उभे राहणाऱ्या आपल्या भारताचे सर्वांगीण संशोधन सातत्याने होण्याची गरज आहे, ज्यासाठी गजानन मेहेंदळेंसारखे संशोधक तयार व्हावेत, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी यांनी आज येथे व्यक्त केली.ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्रकार गजानन भास्कर तथा गजाभाऊ मेहेंदळे यांचे 17 सप्टेंबर 2025 रोजी अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आज स्मृती संकल्प सभेचे येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी, इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे (आयसीएचआर) अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, खजिनदार नंदकुमार निकम व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत उपस्थित होते.यावेळी बोलतांना कृष्णगोपालजी यांनी गजाभाऊ मेहेंदळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. इतिहासातील सत्य बाहेर आणण्यासाठी आयुष्यभर धडपड करणारा हा माणूस अद्वितीय होता. गजाभाऊंचे संशोधनाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी इतिहासाचा धांडोळा घेतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कामगिरीचे पैलू त्यांनी उलगडून दाखवले. आपल्या देशाची, इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची प्रतिमा वाईट करण्याचे काम इंग्रजांनी जाणीवपूर्वक केले. भारताला ख्रिश्चन करण्याचे त्यांचे षडयंत्र आपल्या थोर पराक्रमी महापुरुषांनी हाणून पाडले. त्यावर विस्तृतपणे सखोल संशोधन होण्याची गरज आहे. इतिहासाचे संशोधन फक्त राजा, साम्राज्य इथपर्यंतच अपेक्षित नसून देशातील विविध मुद्यांचा सर्वांगीण बाजूने वेध घेता आला पाहिजे, म्हणजे संशोधन परिपूर्ण होऊ शकेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande