
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
मानवत तालुक्यातील प्रसिद्ध श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर, यशवाडी संस्थान ते मानवत–परभणी राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या रस्त्याच्या विकासकामाची पाहणी आमदार राजेश विटेकर यांनी आज केली.
या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, संबंधित कामासाठी निधी आमदार विटेकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या निर्मितीमुळे श्रीक्षेत्र यशवाडी संस्थानकडे जाणाऱ्या भाविकांना प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे.
पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार राजेश विटेकर यांनी श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिरात दर्शन घेतले आणि रस्त्याच्या गुणवत्तेची व कामाच्या गतीची माहिती घेतली.
या वेळी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, सभापती पंकज आंबेगावकर, तसेच नारायण भिसे, दत्तराव जाधव, गजू वैद्य, किरण तळेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या रस्त्याच्या पूर्णत्वानंतर यशवाडी संस्थानकडे जाणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis