मानवत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून राणी अंकुश लाड यांची उमेदवारी जाहीर
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरातील समाजसेवक डॉ. अंकुश लाड यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा परभणी येथे आयोजित का
पक्षाने मानवत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरातील समाजसेवक डॉ. अंकुश लाड यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा परभणी येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

या कार्यक्रमात मानवत नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी डॉ. राणी अंकुश लाड यांची अधिकृत उमेदवारी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली.

पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये प्रकाश पोरवाल, गिरीश कत्रुवार, बाळासाहेब मोरे, सुरेश काबरा, गणेश कुमावत, मोहन लाड, संजय बांगड, डॉ. राजेश्वर दहे, अ‍ॅड. किरण बारहाते, राजू खरात, राजेश वासुंबे, कविता धबडगे, अभिषेक अळसपुरे, किशोर लाड, दत्ता चौधरी, विनोद राहाटे, बाजीराव हळनोर, नियामत खान, अ.रहीम अ.करीम, सय्यद जमील, स्वप्निल शिंदे, गणेश उगले आदींचा समावेश आहे.

या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे मानवत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणखी मजबूत झाला असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande