विवाहित तरुणाची विकृत हरकत; लग्न नाकारल्यावर महिलेला धमकी व अत्याचाराचा प्रयत्न
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। विवाहास नकार दिल्याचा राग मनात धरून एका विवाहित तरुणाने स्थानिक महिलेला धमकी देत तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना पेण तालुक्यातील शिवाजीनगर, रामवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाड
विवाहित तरुणाची विकृत हरकत; लग्न नाकारल्यावर महिलेला धमकी व अत्याचाराचा प्रयत्न


रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। विवाहास नकार दिल्याचा राग मनात धरून एका विवाहित तरुणाने स्थानिक महिलेला धमकी देत तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना पेण तालुक्यातील शिवाजीनगर, रामवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाड आणि धमकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या राहत्या घरी असताना आरोपी रा. देवरिया, उत्तर प्रदेश; सध्या रा. रामवाडी, समर्थनगर, पेण हा तिच्या घरी आला. त्याने फिर्यादीकडे लग्नाबाबत चर्चा करण्याचा बहाणा करत विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र फिर्यादीने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्ती बोलण्याचा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीने सांगितले की, आरोपी विवाहित असून त्याची पत्नी व मुले आहेत. हे सांगितल्यावर आरोपी म्हणाला, “तुला जे हवे ते मी आणून देईन, तू माझ्यावर लक्ष दे”. फिर्यादीने त्याला विरोध केल्यावर आरोपी संतापला आणि “होकार नाही दिलास तर तुझ्या वडिलांना ठार मारेन” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेच्या जवळ जाऊन तिच्या छातीवर हात टाकत तिचा पोशाख फाडून अपमानास्पद वर्तन केले.

या घटनेनंतर फिर्यादीने तत्काळ पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता, २०२३ मधील कलम ७४, ३५१(२), आणि ३२४(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती गौरी जाधव करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande