
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुण्यातील वाकड आणि हिंजवडी भागात म्हाडाने कमी किंमतीत घरे उपलब्ध करून दिली असून, ९० लाखांची घरे २८ लाखांमध्ये मिळणार आहे, असे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण, हे वृत्त खोटे आहे. म्हाडाने याबद्दल खुलासा केला असून, नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे असे आवाहन केले . सध्या सोशल मीडियावर म्हाडाच्या नावाने पुणे शहराबाबतीत काही खोट्या सोडती व बातम्या प्रसारित होत आहेत. कृपया अशा अफवांना बळी पडू नका. म्हाडातर्फे अशी कोणतीही सोडत जाहीर करण्यात आलेली नाही आहे. महानगरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या असून, म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जात आहे. पण, पुण्यातील वाकड आणि हिंजवडीमध्ये म्हाडा ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये देणार असल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले. हे वृत्त म्हाडाने फेटाळून लावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु