ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापरावर नियमन व नियंत्रण
नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. नांदेड जिल्ह
Q


नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.

कोणताही व्यक्ती, संस्था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनांवर ध्वनीक्षेप व ध्वनीवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क्र.1 दिनांक 31 जुलै 2013 नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत दि. 3 डिसेंबरपर्यत अंमलात राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande